बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)
अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रहिवासी गगन वाल्मीक कांबळे, वय 42 वर्षे, यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गगन कांबळे यांनी व्हेटर्नरी डॉक्टरचा कोर्स पूर्ण केला होता आणि ते खाजगी प्रॅक्टिस करत असत. ते मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.गगन कांबळे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबीयांना सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठवले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
नैराश्यावर बोला, मदत घ्या
आयुष्यात अडचणी येत असतात, पण आत्महत्या हा पर्याय नाही. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी नैराश्यात असेल तर कृपया बोला. मदत उपलब्ध आहे : भारत सरकारची मानसिक आरोग्य हेल्पलाइन किरण – 1800-599-0019 (24 तास) आसरा हेल्पलाइन – 91-9820466726जवळच्या मित्राला, कुटुंबाला किंवा डॉक्टरांना आपल्या भावना सांगा.
