बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात एका निर्जन स्थळी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १५ गोवंशीय प्राण्यांची पोलिसांनी सुटका करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी शिवारात असलेल्या निर्जन स्थळी एका पाझर तलावाजवळ अज्ञात व्यतीने १२ बैल आणि ३ गाई बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी क्रूरतेने बांधून ठेवल्या होत्या. त्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश क्षिरसागर. पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, नितीन वारे यांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:३० वा. च्या सुमारास घटनास्थळी हजर होऊन त्या १५, गोवंशीय प्राण्यांची सुटका करून ३ लाख ५ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेऊन गोवंशीय प्राण्यांची त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.
पोलिस कॉन्स्टेबल राहुल तरकसे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु र नं ७१०/२०२३, प्राण् यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० ११(१) नुसार गुन्हा दाखल आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे हे तपास करीत आहेत.
रात्र गस्ती पथकाला तपास लागला नाही
दरम्यान, कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करून कारवाई करण्या संदर्भात पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पथकाला कळविले होते परंतु रात्रगस्तीवर असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काझी, हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव हे जनावरे डांबून ठेवलेल्या ठिकाणी गेले; परंतु त्यांना जनावरे सापडली नाहीत. मात्र त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी कारवाई केली.
अज्ञात आरोपीला लवकरच पोलिस ताब्यात घेणार
गोवंशीय प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी असताना बेकायदेशीररित्या त्यांची कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या आरोपीला लवकरच पोलिस तपास करून ताब्यात घेतले जातील असे पोलिसांनी सांगीतले.
