गौतम बचुटे/केज: बीड जिल्ह्यातील टाकळी, ता. केज येथील विलास घुले खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडीने पूर्ण करून 10 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दि. 29 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात होणार आहे.नेमकं काय घडलं होतं?

दि. 20 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता टाकळी येथे एका वादातून हा प्रकार घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका जुन्या वादातून काही आरोपींनी उमेश माने याला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना प्रथम केजच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दि. 21 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी मयताचे बंधू रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला हा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या SIT पथकाने केला, त्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता.सीआयडीकडून 10 जणांवर चार्जशीट सीआयडी पथकाने तपास पूर्ण करून दि. 15 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, शुभम गायकवाड, सुरज गायकवाड, राजकुमार मोरे, बंकट उर्फ अजय कदम, दीपक कदम, नवनाथ कदम आणि संतोष कदम या 10 आरोपींचा समावेश आहे.दि. 16 सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी झाली असून, आता उद्या 29 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष केज न्यायालयाकडे लागले आहे.