अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुनंदाताई मुंदडा यांची मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. छत्रपती संभाजीनगरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड जाहीर करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी किरण एम. चौधरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनंदाताई मुंदडा यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल आमदार नमिताताई मुंदडा, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी), पंगेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा अक्षय मुंदडा, तसेच मार्केट कमिटीचे राजूशेठ भन्साळी, ॲड. आर. डी. कदम, बळीराम चोपणे, वसुंधरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश शर्मा यांनी अभिनंदन केले.यासोबतच माजी नगराध्यक्ष महादूभाऊ मस्के, संतोष आबा लोमटे, वैद्यनाथ देशमुख, डॉ. पाचेगावकर, उमाकांत दीक्षित, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की, सीए वालवडकर, सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक कुलकर्णी सर यांच्यासह राजकीय, सामाजिक, बँकिंग व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding... More by Beed News Express

