धारूर: तालुक्यातील आडस येथून घरासमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडस (ता. केज, जि. बीड) येथील शेतकरी अनिल जगन्नाथ शेंडगे (वय ४२ वर्ष) यांनी आपली काळ्या रंगाची व त्यावर सिल्व्हर रंगाचा पट्टा असलेली मोटारसायकल (क्र. एम.एच.-४४-व्ही-९३११) घरासमोर उभी केली होती. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने अखेर अनिल शेंडगे यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून धारूर पोलिसांत ३० सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मस्के करत आहेत.