सिरसाळा/बीएन प्रतिनिधी: परळी तालुक्यातील सिरसाळा येथील आयेशा कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सादिक हसनमियाँ अत्तार (वय ५५, व्यवसाय – बांगड्या विक्री, रा. आयेशा कॉलनी, सिरसाळा) हे ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कामानिमित्त बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून आत ठेवलेले दागिने चोरून नेले.

चोरीला गेलेला मुद्देमाल:

  • ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र (१८ मणी) – ४२,००० रु.
  • २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स – २८,००० रु.
  • ८ भार चांदीचे दागिने (गळ्यातील साखळी, ब्रेसलेट, जोडवे) – १६,००० रु.
  • एकूण मुद्देमाल – ८६,००० रुपये

या प्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार आडेकर करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...