गौतम बचुटे/केज:-केज तालुक्यातील सातेफळ येथील १ कोटी ६० लाख रुपयांची जल जीवन मिशन योजना ४ वर्षे झाली तरी अपूर्ण असल्याने, काम पूर्ण करून योजना चालू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

केज तालुक्यातील सातेफळ येथे सन २०२२ मध्ये १.५९ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना मंजूर झाली होती. मात्र ४ वर्षे उलटूनही काम पूर्ण न झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत घाडगे यांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर दि. २ नोव्हेंबर रोजी हनुमंत घाडगे आणि सातेफळ येथील घाडगे वस्तीवरील महिला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...