विश्वजीत गंडले/घाटनांदुर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी करिअर ॲडव्हान्स योजने अंतर्गत प्रोफेसर पदासाठी नुकत्याच मुलाखती घेतल्या. त्यात निवड समितीने वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर येथे भूगोल विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले डॉ. सखाराम वाघमारे यांची प्रोफेसर पदी निवड केली आहे.

डॉ. वाघमारे यांनी आत्तापर्यंत पंधरा पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य असलेल्या डॉ. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थी पीएच. डी. चे संशोधन करत आहेत. आतापर्यंत त्यांचे 75 पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब देशमुख, सचिव गोविंद देशमुख, सरपंच सत्यभूषण क्षीरसागर, प्र. प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, डॉ. मदन सुर्यवंशी, डॉ. ए. आय. खान, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, उमेश सरनाईक यांच्यासह सर्व प्राध्यापक व मित्रपरिवाराने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पेटंटमुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख

डॉ. वाघमारे यांना भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाकडून ‘वनस्पतीच्या प्रत्यारोपणासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला’ प्रथमच पेटेंट मंजूर झाले आहे. कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष अडचणींचा अभ्यास करून हे अभिनव उपकरण विकसित केले आहे. या डिझाईन नोंदणीमुळे त्यांच्या वैज्ञानिक कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.