अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव आणि लातूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील दिशादर्शक फलकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही फलकांवरील माहिती अर्धवट गायब झाली आहे, तर काही ठिकाणी केवळ लोखंडी सांगाडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंबाजोगाई-लातूर हा महत्त्वाचा राज्यमार्ग असून या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. रस्त्यावर लावलेले दिशादर्शक फलक हे नवीन वाहनचालकांना आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना योग्य दिशा दाखवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.मात्र प्रत्यक्षात या मार्गावरील फलकांची अवस्था दयनीय झाली आहे. लोखंडी सावरगाव ०४ किमी, अंबाजोगाई ०८ किमी दर्शवणाऱ्या फलकाचे मधले पत्रे गायब आहे. तर माकेगावकडे जाणाऱ्या फलकावर फक्त बाण आणि अर्धे नाव शिल्लक आहे. एका ठिकाणी तर पूर्ण फलकच गायब होऊन फक्त रिकामा चौकट उभी आहे.या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सांगितले की, रात्रीच्या वेळेस आणि नवीन चालकांना फलक नसल्यामुळे चुकीच्या मार्गावर जावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या फलकांची दुरुस्ती करावी आणि ज्या ठिकाणी फलक गायब आहेत त्या ठिकाणी नवीन फलक बसवावेत, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांमधून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...