अंबाजोगाई/प्रतिनिधी: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत आयोजित NASA (अमेरिका) आणि ISRO (श्रीहरिकोटा) शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी तालुकानिहाय अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रविवार दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी तालुका स्तरावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची काटेकोर तपासणी करून ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव (घाट) येथील इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी श्रावणी सुभाष घोडके हिने 53 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अंबाजोगाई तालुका – निवड झालेले पहिले 10 गुणवंत विद्यार्थी
- श्रावणी सुभाष घोडके (इ. 8 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव (घाट) – 53 गुण
- रुद्र माणिक वाघमारे (इ. 7 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पठाण मांडवा – 48 गुण
- वेदांत रामदास धायगुडे (इ. 7 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा धायगुडा – 47 गुण
- क्रांती अनंत सोनटक्के (इ. 8 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूस – 46 गुण
- विराट संजय चौधरी (इ. 7 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनई – 45 गुण
- सोहम संजय कोंडेकर (इ. 7 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूस – 45 गुण
- विवेक धनराज गोचडे (इ. 6 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनई – 45 गुण
- प्रतिक्षा गणेश थोरात (इ. 6 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ – 45 गुण
- पुष्पा ईश्वर फड (इ. 6 वी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरटोन – 44 गुण
- सिद्धी अशोक गंगणे (इ. 8 वी) – जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी – 44 गुण
