अंबाजोगाई/प्रतिनिधी: बीड जिल्हा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ISRO आणि NASA शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणीचा निकाल जाहीर झाला असून, यात अंबाजोगाई तालुक्यातील तीन गुणवंत मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशाने १०० गुणांची (७५ वस्तुनिष्ठ + २५ निबंध) परीक्षा घेण्यात आली होती.जिल्हा परिषदेचे पत्र क्र. No – 6187, दि. 3 NOV 2026 नुसार अंबाजोगाई तालुक्याची अंतिम गुणवत्ता यादी खालीलप्रमाणे आहे:

१. क्रांती ए. सोनटक्के – (Z.P.H.S. Poos, इयत्ता ८ वी) – ४३ गुण
निवड: NASA व ISRO दोन्ही सहलीसाठी (तालुक्यात प्रथम क्रमांक)

२. सिद्धी गंगणे – (Z.P.H.S. Radi, इयत्ता ८ वी) – ३८ गुण
निवड: ISRO देशांतर्गत सहल (श्रीहरिकोटा)

३. प्रतीक्षा जे. थोरात – (Zpps Kumbhephal, इयत्ता ६ वी) – ३७ गुण
निवड: ISRO सहल (कन्या राखीव कोट्यातून)

निकष काय होता?

प्रत्येक तालुक्यातून गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवणारा १ विद्यार्थी NASA च्या आंतरराष्ट्रीय सहलीसाठी (एकूण ११ तालुके = ११ विद्यार्थी) तर प्रत्येक तालुक्यातून पहिले ३ विद्यार्थी ISRO च्या सहलीसाठी (एकूण ३३ विद्यार्थी) निवडण्यात आले आहेत. कन्या राखीव अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून पहिले २ विद्यार्थी आणि तिसऱ्या स्थानी सर्वोत्तम गुण मिळवणारी मुलगी यांची निवड करण्यात आली आहे.या निवड झालेल्या विद्यार्थिनींना आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, भा.प्र.से. यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

क्रांती सोनटक्के चा सत्कार

अंबाजोगाई तालुक्यातून NASA-ISRO सहलीसाठी निवड झालेल्या क्रांती सोनटक्के व तिच्या आई-वडिलांचा सत्कार पुस येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व गावकरी उपस्थित होते.

नासा व इस्त्रो सहल निवड

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...