वडवणी: वडवणी शहरातील मध्यवर्ती असलेल्या साठे चौकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बसने प्रवास करणाऱ्या ग्रामीण महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठळबन येथील ६० वर्षीय महिला सुभाबाई पांडुरंग मुंडे या आपल्या मुलीसह बीडच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जात होत्या. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता साठे चौकात त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात हात मारला.या चोरीत त्यांच्या गळ्यातील सुमारे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि मणी असा एकूण ४४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने पळवला.

बसमधून उतरल्यानंतर गळ्यातील दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.याप्रकरणी त्यांनी वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध BNS कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार उबाळे करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...