आग विझविण्याच्या प्रयत्नात शेतकरी भाजून जखमी
गौतम बचुटे | केज: केज तालुक्यातील सातेफळ येथे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाला. डोळ्यादेखत ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहून आग विझविण्यासाठी धाव घेतलेल्या शेतकऱ्यालाही आगीत भाजल्याने दुखापत झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातेफळ येथील शेतकरी संजीवन नामदेव कांदे यांच्या सातेफळ शिवारातील ऊसाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता आगीने संपूर्ण शेताला वेढा घातला आणि पाच एकरांवरील ऊस जळून खाक झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच संजीवन कांदे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने ते स्वतः भाजून जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच केज नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर क्षणात पाणी फेरले गेले असून, संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच विद्युत तारांची तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यातजोगाईवाडी तलावावर विदेशी पक्ष्यांची हजेरी! पक्षीप्रेमींची गर्दी
स्पार्किंगमुळे आग
दरम्यान, विद्युत तारांमध्ये झालेल्या स्पार्किंगमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शेतकरी संजीवन कांदे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. संबंधित विभागाने आगीच्या कारणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचा पंचनामा करावा आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आग विझविताना शेतकरी जखमी
स्वतःच्या शेतातील ऊस वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या शेतकऱ्यालाच आगीत भाजून दुखापत झाली. विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे शेतातील पिकांच्या सुरक्षिततेचा आणि विद्युत तारांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
