केज (प्रतिनिधी):शेतातील विहिरीवर पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना केज शिवारात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय संजय इंगळे (वय २७, रा. इंगळेवस्ती, केज) यांनी आपल्या वडिलांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक: MH 44 AB 5158) दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:१५ ते ३:३० वाजेच्या सुमारास सोनीजवळ रस्त्याच्या बाजूला गाडीलाच चावी ठेवून उभी केली होती. ते शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून अंदाजे ४०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी अजय इंगळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करत आहेत.
