परळी :- लग्न म्हटलं की खर्च आलाच. गरीब कुटुंबाला तर हा खर्च डोंगराएवढा वाटतो. अशा वेळी धावून येणारा एक हात मदतीचा, खूप मोठा आधार ठरतो. असाच आधार परळीतील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने दिला आहे.संस्थेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मुलीच्या लग्नासाठी ५,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

परळी येथील भिमनगर भागातील मयत अरुण जगतकर यांच्या मुलीचा सोमवारी ( दि. २२/११/२०२६) विवाह होता. या प्रसंगी मुलीच्या आईस संस्थेच्या वतीने ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ही मदत संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, ज्येष्ठ मार्गदर्शक वैजनाथ सावंत, परळी नगरपालिकेचे शंकरराव साळवे, अशोक जगतकर, राहुल जगतकर, सुरेश घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी या उपक्रमाबद्दल लग्न कार्यालयातील मंडळींकडून संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. नागरिकांतूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.याबाबतची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्रेम जगतकर यांनी दिली.

४ वर्षांपासून अविरत सेवा

ही मदत एकदाच केलेली नाही. गेल्या ४ वर्षांपासून परळी शहरातील भीम नगर, साठे नगर, रमा नगर, प्रबुद्ध नगर आदी भागातील गरीब व होतकरू मुलींच्या लग्नासाठी संस्थेकडून दरवेळी ५ हजार रुपयांची मदत केली जाते. हीच परंपरा याही वेळी कायम ठेवण्यात आली.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...