अंबाजोगाई/ बीएन वृत्तसेवा:- अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या जोगाईवाडी तलावावर विदेशी पक्षी दिल्यानंतर आता तलावावर आणखी एक दुर्मिळ पाहुणा दाखल झाला आहे – फ्लेमिंगो!. मंगळवारी (दि. 24) लातूरहून पक्षी निरीक्षकांची टीम प्रत्यक्ष जोगाईवाडी तलावावर निरीक्षणासाठी आली होती.

पक्षी निरीक्षक

त्यामध्ये धनंजय गुटे, रमाकांत केंद्रे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत अंबाजोगाई येथील प्रा. अभिजीत लोहिया, हेमंत धानोरकर, प्रदीप तरकसे, रत्नाकर निकम, सदानंद वालेकर, वानखेडे उपस्थित होते. या टीमने तलावावर फ्लेमिंगोची नोंद घेतली. एकाच पायावर उभा, लांब मान आणि गुलाबी-पांढऱ्या रंगाचा हा फ्लेमिंगो सध्या तलावाचे मुख्य आकर्षण ठरला आहे. फ्लेमिंगो सहसा खाऱ्या पाण्याच्या भागात दिसतो. तो जोगाईवाडीत येणे म्हणजे इथली परिसंस्था अजून जिवंत असल्याचे लक्षण आहे, असे निरीक्षकांनी सांगितले.

तलावावर सध्या कोणते पक्षी आहेत

फ्लेमिंगो, कॉमन पोचार्ड, ओपन बिल स्टॉर्क, ब्लॅक हेडेड बंटिंग, ग्रेट थिक नी हे सर्व ५ दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्षी सध्या एकाच वेळी जोगाईवाडी तलावावर आहेत. सायबेरिया, युरोप आणि उत्तर भारतातून आलेले हे पाहुणे हिवाळ्यासाठी इथे मुक्कामी आहेत.

  तलावातील पाणी दिवसेंदिवस आटत आहे.  

या पक्ष्यांना फिडिंगची गरज नाही, तर पाणी टिकवून ठेवण्याची गरज आहे. पाणी आटलं तर फ्लेमिंगोसह सर्व पक्षी दुसऱ्या तलावाकडे निघून जातील, असा इशारा निरीक्षकांनी दिला. तलावात दिवस रात्र पाण्याची मोटरी तसेच इंजीन व्दारे पाणी

ही पण बातमी वाचा तलावाची

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...