ङि वालेकर/अंबाजोगाई :- राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवार (दि. ११) पासून घटस्थापनेने सुरू होत आहे. या महोत्सवात नऊ दिवस कीर्तन, भजन, प्रवचन आणि सुगम व शास्त्रीय संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

अश्विन प्रतिपदेला रविवारी सकाळी १० वाजता योगेश्वरी मंदिरात तहसीलदार तथा देवळ समितीचे अध्यक्ष विलास तरंगे यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना होईल. पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवळ समितीचे सचिव गिरधारीलाल भराडिया यांनी दिली.या दसरा महोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून भाविकांच्या दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.नऊ दिवसांचा उत्सवदररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक भजनी मंडळांचे भजन होईल. रविवारी सायंकाळी ६ ते ८ ओंकार प्रभूघाटे व रात्री ८ ते १० असावरी देगलूरकर यांचे गायन होईल. सोमवारी भाग्यश्री देशपांडे व ज्ञानेश्वरी गाडगे, मंगळवारी श्रुती बोरगावकर व दीपिका भिडे, बुधवारी श्रीधर फडके यांचे गीत रामायण व मधुवंती बोरगावकर, गुरुवारी अर्चना कान्हेरे, शुक्रवारी जयंत केजकर व कृष्णा बोंगाणे, शनिवारी रेवा नातू व भाग्यश्री टिकले आणि रविवारी पंडित श्रीपाद लिंबेकर व मुग्धा गावकर यांचे गायन होणार आहे.पूर्णाहुती व पालखी मिरवणूकअश्विन शुद्ध अष्टमी व नवमीला सोमवारी सकाळी ८ वाजता होमहवन होऊन सव्वा अकरा वाजता पूर्णाहुती होईल. मंगळवारी दुपारी १ वाजता दसऱ्यानिमित्त योगेश्वरीची पालखी मिरवणूक सिमोल्लंघनासाठी नियोजित मार्गाने निघणार आहे. या महोत्सवाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवळ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...