अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: बांधकाम साईटवरील वायर चोरीला गेल्याच्या केवळ संशयावरून एका मजुरावर लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे. शिवाजी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्रान हुसेन शेख (वय 35, रा. गुरुआरपेठ) हे बांधकाम मजूर आहेत. रविवार, 9 नोव्हेंबर रोजी रात्री ते शिवाजी चौकातील किशोर परदेशी यांच्या कार्यालयासमोरून जात होते. त्यावेळी त्याच बांधकामावर काम करणारा शफिक जलीस सय्यद हा त्याच्या साथीदारांसह तिथे उभा होता.इम्रान यांना पाहताच शफिकने त्यांना अडवून वायर चोरीचा जाब विचारला. यावरून दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली आणि क्षणातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी शफिक जलीस सय्यद याने दगडाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रहार केला, ज्यात त्यांच्या उजव्या गालाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या साथीदारांनीही काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी इम्रान शेख यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शारेक जलीस सय्यद (रा. अजमेरनगर, अंबाजोगाई)असलम फिरोज शेख (रा. रविवारपेठ, अंबाजोगाई)सलमान जरगर (रा. झारेगल्ली, अंबाजोगाई)सय्यद मुहम्मद (रा. बाराभाईगल्ली, अंबाजोगाई)येथील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...