अंबाजोगाई/ बीएन वृत्तसेवा: यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे ४२ वे वर्ष आहे. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात हा समारोह रंगणार असल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
स्व. भगवानराव लोमटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या समारोहाची मराठवाड्यासह राज्यात वेगळी ओळख आहे.काय आहे तीन दिवसात -समारोहाचा शुभारंभ बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० वाजता पुण्याचे प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांच्या हस्ते होईल. त्याच रात्री ८.३० वाजता कवी संमेलन होणार असून अध्यक्षस्थानी गझलकार नितीन देशमुख (अमरावती) तर सूत्रसंचालन कवी रोहित शिंगे (इचलकरंजी) करणार आहेत.
उद्घाटन व कविसंमेलन
यार्षीच्या समारोहचा उदघाटन बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे येथील नाटककार, लेखक, अभिनेता व माहितीपटकार अतुल पेठे यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. तर रात्री ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी अमरावती येथील सुप्रसिद्ध कवी, गझलकार नितीन देशमुख हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन इचलकरंजी येथील कवी रोहित शिंगे हे करणार आहेत. तर इतर कवी आत्तम गेंदे ल-पालम, रंजना गायकवाड-अहमदपूर, एजाज शेख-अकोला, अपूर्व राजपूत-सोयगाव, विजया टाळकुटे-जेजुरी, प्रमोद राठोड–नाशिक व अविनाश पोइनकर-चंद्रपूर यांचा सहभाग राहणार आहे.
बाल आनंद मेळावा व गझल गायन
गुरूवार, दि.२६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक प्रभाकर साळेगावकर माजलगाव हे शालेय विद्यार्थ्यांना कविता, गप्पागाणी, कथा सांगून मार्गदर्शन करतील रात्री ८ वा. हाज़िर-ए-ग़ज़ल हा गझल गायनाचा कार्यक्रम होईल. सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांचे शिष्य प्रसिद्ध युवा गझल गायक भाविक राठोड, पुणे हे गझल गायन सादर करतील. युवा गायिका ऋतुजा वानखडे व सुवर्णा कोळी या गायनाला साथ देतील, धवल जोशी – बासरी, स्वप्नील जोशी – कीबोर्ड, मिलिंद शेवरे–गिटार हे साथसंगत करतील व नासिर खान हे निवेदक असणार आहेत.
समारोप व पुरस्कार वितरण
याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभ होईल. सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत व माजी न्यायाधीश प्रकाश परांजपे, धुळे हे अध्यक्षस्थानी असतील. याच समारंभात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार सर्वश्री पद्मश्री श्रीरंग दादा लाड – परभणी यांना कृषी, श्रध्दा बेलसरे (खारकर)–अंबाजोगाई यांना साहित्य, गंगाधार देव–नांदेड यांना संगीत व सुप्रसिद्ध तरुण गायिका कु. नंदिनी व कु. अंजली अंगद गायकवाड–तांदुळजा ह. मु . पुणे यांना संगीत युवा गौरव पुरस्कार प्रदान केले जातील.
शास्त्रीय संगीत सभा
याच दिवशी रात्री ८.३० वाजता पुणे येथील पण तांदुळजा येथील रहिवासी सुप्रसिद्ध युवा गायिका झी युवा संगीत सम्राट विजेती आणि क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया विजेती कु. नंदिनी गायकवाड व झी टिव्ही सारेगमप लिटिल चॅम्प विजेती व इंडियन आयडॉल फेम कु. अंजली गायकवाड यांचे शास्त्रीय गायनासोबत भावगीत,भक्तिगीत,गझल,नाट्यगीत सादर करतील. त्यांना अंगद गायकवाड संवादिनी, रोहन गोराने तबला, बंकटकुमार बैरागी–पखवाज व श्रीरूप धाट टाळाची साथसंगत करतील.
