गौतम बचुटे/केज: केज : केज-कळंब राज्य महामार्गावरील माळेगाव शिवारात रवीवारी (दि. 01) मध्यरात्री ११:३० वाजता भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील अज्ञात टँकरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव भीमा पवार (रा. साळेगाव, ता. केज) हे आपल्या MH-13/CF-7459 या दुचाकीवरून केजकडे येत होते. त्यांच्यासोबतच दुसरे दुचाकीस्वार MH-16/X-1369 या गाडीवरून प्रवास करत होते. दोघेही माळेगावजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने दोन्ही गाड्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दोन्ही दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात महादेव पवार यांच्यासह दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दोघांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेचे पायलट मकरंद घुले हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यापूर्वीच दुसऱ्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले.

प्रकृती चिंताजनक

सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे फरार टँकरचा शोध घेत आहेत. या मार्गावर रात्री अवजड वाहनांचा वेग जास्त असतो, त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...