अंबाजोगाई/प्रतिनिधी :- मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी शैक्षणिक संकुल व वसतिगृह उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला अंबाजोगाई नगर परिषदेच्या सभेत एकमताने मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे.
श्रीमती श्रुती अमोल लोमटे यांनी अध्यक्ष यांच्या परवानगीने हा प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी शैक्षणिक संकुल व वसतिगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बाबतचा हा प्रस्ताव होता.
यावर अध्यक्ष नंदकिशोर शिवबागस मुंदडा यांनी असे सुचविले की, सर्व्हे नं. ५५४ येथे जागेची पाहणी करून सदरील ठिकाणी वसतिगृह व शैक्षणिक संकुल उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावा. या त्यांच्या सूचनेस मोदी राजकिशोर कांता प्रसाद यांनी अनुमोदन दिले व सर्वांनी एकमताने मान्यता दिली.
या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. लवकरच जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाणार असून, या संकुलामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकमताने मान्यता
सर्व्हे नं. ५५४ येथे जागेची पाहणी करून सदरील ठिकाणी वसतिगृह व शैक्षणिक संकुल उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावा, या सूचनेला सर्वांनी एकमताने मान्यता दिली.
