गौतम बचुटे / केज : केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली आहे.या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव अतुल वैजनाथ चौधरी (वय २२, रा. पैठण) असे असून तो अविवाहित होता. तो पुण्यात एका कंपनीत नोकरी करत होता. दिवाळी सणासाठी तो गावी आला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने शेतात आत्महत्या केल्याचे सकाळी ६:३० वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.या घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशावरून हेडकॉन्स्टेबल संपत शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. युसूफवडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
कारण अस्पष्ट
पुण्यात नोकरी करणारा अतुल दिवाळीसाठी गावी आला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
मानसिक आधारासाठी Kiran हेल्पलाइन – 1800-599-0019 वर संपर्क साधा.
