विश्वजीत गंडले / घाटनांदूर: शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर येथील राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. विनोद राम वाघमारे यांना ‘महात्मा जोतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले.
शनिवारी, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, गिरीश जाधव, व्यंकट जाधव, ॲड. पाटील यांच्यासह परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी पाटील, सचिव प्राचार्य गोपीनाथ सगर आणि कोषाध्यक्ष व्यंकटराव वडजे उपस्थित होते.
अभिनंदनाचा वर्षाव
हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अर्जुन मोरे, विभागप्रमुख डॉ. मकरंद जोगदंड, डॉ. सखाराम वाघमारे तसेच लेखक-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनंदन केले आहे.
