ऊसतोड मुकादमाने मारहाण केल्याने मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप

गौतम बचुटे, केज :- केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एका ५५ वर्ष वयाच्या ऊसतोड मजुराचा, सांगली तालुक्यात मृत्यू झाला असून त्याचा मृत्यू हा ऊसतोड मुकादमाने केलेल्या मारहाणीमुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करून ऊसतोड मुजराचे प्रेत केज पोलिस ठाण्यात आणले होते.

बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी ता. केज येथील ऊस तोड मजूर बाबासाहेब गोपीनाथ तोगे यांचा मृत्यू हा दि. १३ रोजी सांगली येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान झाला आहे. त्यांना ऊस तोडणीच्या कारणावरून दि. ३० ऑक्टोबर रोजी अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार व राधाबाई आशोक केदार (सर्व रा. सांगवी ता. केज) या तिघांनी मुंडेवाडी येथे मारहाण करून त्यांना जबरदस्तीने ऊस तोडणीसाठी घेऊन गेले होते. त्या नंतर त्यांना सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्या नंतर दि. १३ नोव्हेंबर रोजी त्यांचा दरम्यान मृत्य झाला.

बाबासाहेब तोगे यांच्या मृत्यू नंतर दि. १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांनी बाबासाहेब तोगे यांचे प्रेत एका ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवून ती प्रेत असलेली ॲम्ब्युलन्स रात्री ७:३०वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात घेऊन आले. बाबासाहेब तोगे याचा मृत्यू हा ऊसतोड मुकादम अशोक काशिनाथ केदार, नानाभाऊ काशिनाथ केदार आणि अशोक केदार यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, सांगली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदन करून त्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी व्हीसेरा प्रयोगशाळेकडे पाठविला असून त्याचा स्पष्ट अहवाल आल्या नंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...