अंबाजोगाई – ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी मिळाली तर ती काय चमत्कार करू शकते, याचं उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावच्या सिद्धी चाटे ने घालून दिलं आहे. या उदयोन्मुख जलतरणपटूने विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा क्रीडा संकुलात 3 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिद्धी लक्ष्मीकांत चाटे हिने बाजी मारली आहे.

14 वर्षाखालील गटात सुवर्ण कामगिरी

14 वर्षाखालील मुलींच्या गटात खेळताना सिद्धीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं

  1. 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)

2. 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)

3. 100 मीटर फ्रीस्टाईल – द्वितीय क्रमांक (रौप्यपदक)

अशा प्रकारे दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई करत तिने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे.या दैदीप्यमान यशामुळे वरवटी गावासह संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात आनंदाचं वातावरण असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...