अंबाजोगाई/प्रतिनिधी: राडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थिनीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सिद्धी अशोक गंगणे हिची ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) च्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.या अभिमानास्पद आणि गौरवास्पद निवडीबद्दल तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सिद्धीच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांची मोठी मेहनत आहे. या ISRO च्या कठीण निवड परीक्षेसाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक डॉ.शशिकांत पुरी यांच्या मार्गदर्शना खाली शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि चांगली तयारी करून घेतली. सिद्धीच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती व्ही. एस. गायसमुद्रे व व्ही. बी. मुसळे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन सिद्धीला चांगले तयार केले. त्यांच्या याच मेहनतीचे फळ म्हणून आज सिद्धी ISRO सहली साठी पात्र झाली आहे. सिद्धी ने मिळवीलेल्या यशाबद्दल   सिद्धीचा आणि तिच्या आई-वडिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती व्ही. एस. गायसमुद्रे, व्ही. बी. मुसळे व जगदीश जाधव उपस्थित होते.

जिल्हा परिषद करणार सर्व खर्च

     प्रतिष्ठेच्या सहलीसाठी जिल्हा परिषद बीड सर्व खर्च करणार असून,  विमान प्रवास आणि ISRO सारख्या मोठ्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळणे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.सिद्धी गंगणेच्या या यशाबद्दल राडी गावात व संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यातून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

मिळणार प्रत्यक्ष अंतराळ कार्याचा अनुभव

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञात क्षेत्रातील घडामोडींचाा अनुभव घेण्यासाठी देशांतर्गत श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थुंबा येथील स्पेस म्युझीएम, तिरुअनंतपुरम, केरळ  तसेच विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ॲन्ड टेक्नीकल म्युझीयम, बंगलोर या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

                 शिक्षिका गायसमुद्रे यांची दुसरी विद्यार्थिनी पात्र

यापूर्वी शिक्षिका श्रीमती व्ही. एस. गायसमुद्रे या जि.प. प्रा. शा. केंद्रेवाडी येथे कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांची विद्यार्थिनी नंदिनी गणेश केंद्रे ही 2023 मध्ये ISRO सहलीसाठी पात्र ठरली होती. श्रीमती गायसमुद्रे यांचे हे ISRO परीक्षेतील दुसरे यश आहे. श्रीमती गायसमुद्रे या विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण आणि गुणवत्ता हेरून त्यांना योग्य वळण देण्याचे काम करतात, हेच यातून सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे, त्यांची केंद्रेवाडी येथे पात्र झालेल्या विद्यार्थिनी नंदिनी केंद्रे हिला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल राडी येथे घेऊन आल्या होत्या.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...