अंबाजोगाई – दिवाळीच्या पूर्वसंध्येला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याने नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल 14 मोबाईल फोन शोधून पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.सापडलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत 2 ते 2.50 लाख रुपये असून दिवाळीच्या तोंडावर आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.या शोधमोहिमेत CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले व पोलीस अंमलदार रवी कुमार केंद्रे यांनी विशेष मेहनत घेऊन ही मोहीम यशस्वी केली.
नागरिकांना आवाहन
ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले आहेत किंवा हरवले आहेत, त्यांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. तक्रार देताना मोबाईलचा IMEI क्रमांक, मोबाईल खरेदीचे बिल, मोबाईल क्रमांक व इतर आवश्यक माहिती सोबत आणावी. CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोधण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न करण्यात येतील.
