आष्टी/प्रतिनिधी:- आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडवाडी) शिवारातील सोनी पठार परिसरात आज शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने / बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने / बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धामणगाव येथे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच टिपेश्वरचा रामलिंग वाघ आष्टीच्या जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यात दिसला होता, त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वनविभागाकडून अधिक तपास सुरू आहे.या घटनेमुळे देवळाली, लोखंडवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
