गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील कापरेवाडी येथून ४५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. पती रात्री शेतात गेल्यानंतर ही घटना घडली.
कापरेवाडी येथील गणेश सुंदरराव कापरे हे दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री शेतातील गोठ्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरी होती.
दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी घरी आल्यानंतर पत्नी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी बँकेत नोकरी करत असलेल्या मुलीकडे चौकशी केली असता, तिला याबाबत काहीही माहिती नसल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर गणेश कापरे यांनी पिंपरी, बोरगाव येथील मंदिरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र पत्नी आढळून आली नाही.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे
वय सुमारे ४५ वर्षे, उंची ५ फूट, अंगात पिवळसर रंगाची साडी व पिवळसर ब्लाऊज, गळ्यात सोन्याचे मणी मंगळसूत्र, पायात चप्पल, केस काळे-पांढरे, हातात बांगड्या. तिला मराठी भाषा बोलता येते व समजते. गणेश कापरे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३४/२०२६, भा.न्या.सं. १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महावीर सोनवणे तपास करत आहेत.
