केजच्या डी बी पथकाची धडाकेबाज कारवाई !
गौतम बचुटे, केज :- केज पोलिस ठाण्याच्या डी बी पथकाने धडाकेबाज कारवाई करून अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा ता. जामखेड येथील एका अट्टल चोरट्याने चोरलेल्या पंधरा मोटार सायकली जप्त करून, चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
केज पोलिस ठाण्याच्या डी बी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे आणि त्यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, राहुल तरकसे, नितीन वारे, संतोष गित्ते, शिवाजी कागदे, दादाराव देवगुडे यांच्या पथकाने केज येथून चोरीला गेलेल्या एका मोटार सायकलचा तपास करीत असताना मोटार सायकल चोरी झालेल्या भागातील सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहिती आधारे माहिती घेतली.
त्या आधारे तपास केला असता मोटार सायकल चोरणारा चोरटा हा खर्डा ता. जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे समजले. त्या आधारे डी बी पथकाने, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड येथे जाऊन संजय बबन पवार याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून हॅण्डल लॉक तोडून बनावट चावी वापरून चोरून नेवून विक्री केलेल्या पंधरा मोटार सायकली जप्त केल्या आहे.
मोटार सायकल चोर संजय बबन पवार याने अनेक मोटार सायकल चोरले असल्याची शक्यता आहे. तसेच तो पायाने लंगडा आहे. तो पोलिसांना चकवा देत होता आणि तो चोरीच्या गुन्ह्यात सापडत नव्हता.
डी बी पथकाने केलेली ही मोठी कार्यवाही असून त्यांची कामाची निष्ठा आणि मेहनत वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व पथकाचे अभिनंदन !
—– वेंकटराम, सहाय्यक पोलिस अधीक्षक
डी बी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे आणि पोलिस निरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्यासह त्यांचे सहकारी यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.
—– राहुल सूर्यतळ, पोलिस निरीक्षक, पो स्टे. केज
