परळी – तालुक्यातील जिरेवाडी शिवारातून अज्ञात चोरट्याने शेतातील पाण्याची मोटर आणि वायर लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिरेवाडी येथील शेतकरी गोविंद महादेव मुंडे (वय ५५) यांच्या गट क्रमांक ९१ मधील शेतात ही घटना घडली. १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान चोरट्याने त्यांच्या शेतातील जयचिरग कंपनीची ३ एचपीची मोटर (किंमत १०,००० रुपये) आणि सुमारे ४० फूट लांबीची कॉपर वायर (किंमत १,००० रुपये) असा एकूण ११,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या तक्रारीवरून ७ ऑक्टोबर रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...