साईड पट्ट्या गायब झाल्याने अपघाताची भीती!

डी. सदानंद/अंबाजोगाई:
अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २०२२ मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही काळातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या पूर्णपणे गायब झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडल्याने तिथे दरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना समोरून दुसरे वाहन आल्यास गाडी खाली उतरवणे अत्यंत धोकादायक बनले असून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

रस्त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा:

https://www.facebook.com/share/v/1EZDJU3h9o

इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा:
https://www.instagram.com/reel/DeRaMNBPXYp/

▶️ YouTube वर व्हिडिओ पहा – इथे क्लिक करा

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...