ङि सदानंद/अंबाजोगाई:- अंबाजोगाई शहरातील आनंदनगर, ट्युशन एरिया आणि योगेश्वरी नगरी परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रिकामे प्लॉट, नाले आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही स्वच्छता कोण करणार असा प्रश्न नागरीक विचार आहेत.

शहराच्या या भागात नवीन वसाहती झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत संबंधीत यंत्रणेची असणारी कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा तसाच पडून राहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरांचा वावर साचलेल्या कचऱ्यामुळे भटके कुत्रे, डुकरे आणि गुरांचा वावर वाढला आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नाल्यातून थेट नदीपात्रात कचरा विशेष म्हणजे काही ठिकाणी जयवंती नदीला मिळणाऱ्या नाल्यांमध्येही थेट कचरा टाकला जात आहे. यामुळे नाल्यामध्ये सुद्धा प्रदुषण होत आहे.

नागरिकांची मागणी

प्रशासनाने नियमित कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाटीची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आजची अस्वच्छता उद्या मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्येत रूपांतरित होऊ शकते.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...