माजलगाव /बीएन वृत्तसेवा:   अलगद लांबवले होते. या घटनेनंतर माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत केवळ ७ तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

गुरुवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला माजलगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत होती. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी शुक्रवारी (दि. २८) पहाटे एक वाजता माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासाने लागला आरोपीचा ठाव

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तांत्रिक बाबींचे विश्लेषण सुरू केले. पोलीस कॉन्स्टेबल महेश चव्हाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून आरोपीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून किरण लक्ष्मण जाधव (वय २३, रा. मंगरुळ, जि. जालना) याला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही धडकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड, पोलीस हवालदार किशोर जाधव, राम भंडारे, गणेश नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल महेश चव्हाण, महादेव बहिरवाळ आणि होमगार्ड विजय साळवे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...