गौतम बचुटे /केज:- साळेगावचे सुपुत्र दंतरोग शल्यचिकित्सक डॉ. विवेक बचुटे यांची परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दंत शल्य चिकित्सकच्या पदव्युत्तर (MDS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशही झाला आहे. डॉ. विवेक बचुटे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा साळेगाव, माध्यमिक शिक्षण शंकर विद्यालय साळेगाव, तर उच्च माध्यमिक शिक्षण वसंत विद्यालय केज येथे झाले. […]
