विश्वजीत गंडले /घाटनांदुर: घाटनांदूर रस्त्यावरील पुस येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव अपे रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला होता, याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील रस्त्यावरून संदीप कोंडबा नवघरे (वय २५, रा. उटी, ता. महागाव, जि. यवतमाळ) हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना शिवाजी चौकापासून १०० फूट अंतरावर समोरून येणाऱ्या अपे रिक्षा (क्र. MH 28 E 8750) च्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत संदीप नवघरे याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला प्रदीप नावाचा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मृताचे वडील कोंडबा चंपत नवघरे (वय ७९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अपे रिक्षा चालकाविरुद्ध गु.र.नं. २७८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार सूर्यवंशी हे करत आहेत.

महत्वाच्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचत रहा बीड न्यूज एक्सप्रेस…

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.