विश्वजीत गंडले/घाटनांदूर:– अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात जाधव कुटुंबाने एक असा निर्णय घेतला आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

घाटनांदूर येथील पंडित किशनराव जाधव (वय ९७) यांचे १५ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. निधनानंतर पुढचे विधी करताना कुटुंबाने वेगळा विचार केला. अस्थी विसर्जनासाठी नदीत जाण्याऐवजी, जमिनीत खड्डा करून त्यात अस्थी ठेवण्यात आल्या. त्यावर आंबा आणि नारळाची मिळून एकूण सहा झाडं लावण्यात आली. अस्थी आणि रक्षा नदीत सोडल्याने पाणी दूषित होतं. ज्या पाण्यावर आपण पितो, शेती करतो, तेच पाणी आपण खराब करतो. हे टाळायचं असेल तर परंपरा थोडी बदलायला हवी, असं कुटुंबाचं म्हणणं आहे.

मातीतली श्रद्धांजली

पंडित किशनराव जाधव यांच्या अस्थी नदीत न सोडता जमिनीत पुरून त्यावर आंबा आणि नारळाची ६ झाडं लावण्यात आली.ही झाडं मोठी होतील, त्याला फळं येतील, सावली मिळेल आणि त्या झाडांकडे बघितलं की वडिलांची आठवण होईल, हीच आमची खरी श्रद्धांजली आहे, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...