गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या डीबी पथकाने दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया करत अवैध धंद्यांना चांगलाच दणका दिला आहे.

पहिली कारवाई

दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदुरघाट येथील बाजार तळावर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशावरून डीबी पथकाने धाड टाकली.यावेळी शिवा दादा शिंदे (वय २५, रा. नांदुरघाट), दादा चंद्रकांत पवार (रा. रामेश्वरवाडी), युवराज आबासाहेब पवार (रा. पवारवाडी) आणि शाम प्रभु शिंदे (रा. कोल्हेवाडी) हे चौघे सोरट (चिमनी पाखरे) नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडले.पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गु.र.नं. ७१८/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल झाला असून तपास हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे करत आहेत.

दुसरी कारवाई

प्रशांत नगरमध्ये गुटख्याचा साठा जप्त. दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डीबी पथक शहरात गस्त घालत असताना प्रशांत नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बंदी असलेला गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली.पथकाने तात्काळ धाड टाकून सागर बाजीराव चाळक याच्या घरामागील मोकळ्या जागेत लपवून ठेवलेला ११ हजार ८०५ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांच्या फिर्यादीवरून सागर चाळक विरुद्ध भा.न्या.सं. १२३, २७४, २७५, २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, संगीता हनवते, कॉन्स्टेबल नितीन वारे यांनी सहभाग घेतला.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...