सन २०२६-२७ गळीत हंगामाला सुरुवात, शेतकरी, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा बॉयलर अग्नीप्रदीपन दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२६-२०२७ चा बॉयलर अग्नीप्रदीपन दिनांक १८/११/२०२६ रोजी सकाळी दहा वाजता कारखान्याचे विद्यमान संचालक मधुकर विश्वंभर शेरेकर व सौ. सत्यशीला मधुकरराव शेरेकर यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रमेशराव बाबुरावजी आडसकर, व्हाईस चेअरमन दत्तात्रय (आबा) ज्ञानोबारावजी पाटील, सर्व संचालक अॅड. प्रमोद चंद्रकांतराव जाधव, ऋषिकेश प्रकाशराव आडसकर, लक्ष्मीकांत महादेवराव लाड, संभाजी बबुवान इंगळे, गोविंद बालासाहेब देशमुख, राजाभाऊ भगवानराव औताडे, बाळासाहेब यशवंत साळुंके, मधुकर विश्वंभर शेरेकर, अनिल शिवाजीराव किर्दत, जिवन रामराव कदम, अॅड. लालासाहेब बाळासाहेब जगताप, शशिकांत गोपीनाथराव लोमटे, मिनाज यूसुफखॉ पठाण, अनंत भगवानराव कातळे, विठ्ठल संभासाहेब देशमुख, रमाकांत बाळासाहेब पिंगळे, श्रीमती भागीर्थीबाई बंकटराव साखरे.

कार्यकारी संचालक दत्तात्रय नाथा मरकड, सचिव सुरेश बंकटराव साखरे, कारखान्याचे चिफ केमिस्ट संतोष देशमुख, डेप्युटी चिफ इंजिनिअर सुशांत येवले, इलेक्ट्रिक इंजिनिअर संदिपान माने, डिस्टलरी इन्चार्ज प्रकाश साळुंखे, शेतकी अधिकारी रावसाहेब आडे यांचेसह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड ठेकेदार, ट्रॅक्टर मालक, हार्वेस्टर मालक यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...