डि. सदानंद/अंबाजोगाई: कारखाना–पाटोदा रस्त्यावर दोन मोटारसायकलींचा अपघात झाल्याची घटना सोमवारी ( दि. १६) सायंकाळी घडली. या अपघातात दोन्ही मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंबा कारखान्यापासून काही अंतरावर असलेल्या या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून हा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दोन मोटारसायकलींची धडक होऊन अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता अरुंद झाला असून रस्त्याला साईड पट्ट्या नाहीत. यामुळे दोन वाहने समोरासमोरून जाताना खूप अडचण येत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
दोन्ही दुचाकी सकाळी गायब
रात्री घटनास्थळी पडलेल्या दोन्ही मोटारसायकली सकाळी गायब झाल्या असून घटनास्थळी फक्त तुटलेले पार्ट पडलेले आहेत. अपघातानंतर या गाड्या चोरी गेल्या की घरी नेल्या याबाबत नागरिक शंका व्यक्त करीत आहे.
