
गौतम बचुटे /केज:- साळेगावचे सुपुत्र दंतरोग शल्यचिकित्सक डॉ. विवेक बचुटे यांची परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दंत शल्य चिकित्सकच्या पदव्युत्तर (MDS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशही झाला आहे.
डॉ. विवेक बचुटे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा साळेगाव, माध्यमिक शिक्षण शंकर विद्यालय साळेगाव, तर उच्च माध्यमिक शिक्षण वसंत विद्यालय केज येथे झाले. BDS चे शिक्षण बीड येथील आदित्य दंत महाविद्यालयात पूर्ण केले.
कोरोना काळात त्यांनी केज येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा केली. त्यानंतर आशा हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरू केली. आता परभणी येथे तोंडाचे रोगशास्त्र आणि सूक्ष्मजीव (Oral Pathology & Microbiology) या विषयात MDS साठी त्यांची निवड झाली आहे.
कुटुंबाचा अभिमान
वडील रावसाहेब बचुटे यांनी भारतीय सैन्य दलात ३ महार रेजिमेंटमध्ये सुमारे ३० वर्षे सेवा करून ऑनररी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्ती घेतली. आफ्रिकेत भारतीय शांती सेनेतही सेवा केली आहे. आई गृहिणी. ज्येष्ठ बंधू डॉ. आकाश बचुटे हे प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ (MS ENT) आहेत. चुलते गौतम बचुटे हे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आहेत.
डॉ. विवेक बचुटे यांना शिक्षक, मार्गदर्शक, मित्र आणि कुटुंबियांकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
